Thursday, February 4, 2010

धाडसी रुची ( बाल कथा )

"रुची, चला जेवायला" आईची हाक कानी पडली आणि आजी नात टी.व्ही. बंद करुन जेवायला डायनिंग टेबलावरयेउन बसल्या.रात्रीचे नउ म्हणजे जेवायची रोजची वेळ.सगळ्यांनी बरोबर गप्पा मारत जेवायचेठरलेले.दिवसभराच्या गोष्टी रुची जेवताना सांगे.
रुची चे वय दहा अकरा वर्षांचे.ती खूप हुशार आणि ऑल राउंडर होती.शाळेला तिने खूप बक्षिसे मिळवून दिले होती. त्यामूळे ती शाळेत पण सगळ्यांची लाडकी होती. रविवारचा दिवस.आई बाबांनी खरेदीचा प्लान आखला आणिआजी मंदिरात भगवत गीतेवरचे प्रवचन ऐकायला जाणार . पण रुचीला आई बाबां बरोबर जायचे नव्हते.तिचीधुसफुस सूरु झाली.तिला मैत्रिणीं बरोबरखेळायचे होते.
"आम्हाला एकचतर रविवार
मिळतो खेळायला.मला नाही यायचे तुमच्या बरोबर खरेदीला".रुची म्हणाली.
"बंर पण,आजी ये ईपर्यंत बाहेरच मैदानावरच खेळायचे.चालेल? घरात नाही खेळू देणार तुला..." बाबांनी बजावले. आनंदाने रुचीने मोठा होकार दिला.
दुपारचे चार वाजले ,ठरल्या प्रमाणे आई बाबा बाहेर पडले. आजीपण मंदिरात गेली.रुची समोरच्या मैदानावरखेळायला गेली. त्यांचा लगोरीचा खेळ रंगात आला होता.पण रुचीला तहान लागली म्हणून टाईम प्लिज घेऊन घरीपाणी प्यायला आली.आणि घरी बघते तर फाटक ऊघड,दाराचे कुलुप तोडलेले.ते तुटलेले कुलुप तसेच दारालालटकलेले होते. तिच्या पटकन लक्षात आले की चोर घरात शिरले आहेत.ती आधी खूप घाबरली. विचार आला कीपटकन जाऊन आजीला सांगावे,पण मग विचार केला की हे चोर पळून गेले तर.... तिने सगळी हिम्मंत गोळा करूनठरवले की ह्या चोरांना पकडायचेच् आणि चांगलाच धडा शिकवायचा.
बाहेरचे दार हळुच आत ढकलून ती घरात शिरली.हॉल मधे हलकेच वाकुन पाहिलेतर तिथे कोणीच दिसेना. तीपटकन सोफ्यामागे लपून बसली.कोणाचा तरी बोलायकचा आवाज ऐकू येत होता,पण काय बोलत होते ते नीट ऐकूयेत नव्हते. कदाचीत लवकर काम आटपा आसे एकमेकांना सांगत असावेत.
रुची पुढच्या खोलीत जावे का असा विचार करत असतानाच दोन माणसे आतून बाहेर आली. दोघेच होते ते चोर. त्यांच्या हातात चार - पाच पिशव्या होत्या.त्यात बहुदा चोरलेल माल असावा. ती चोर शांत पणे बाहेर पडली .
रुची पण त्यांच्या मगोमग बाहेर पडली. सायकल काढुन पठलाग करु लगली.ती मणसे पायी होती पण फारचभराभरा चालत होती.संध्याकाळची वेळ असल्यामूळे हळू हळू अंधारायाला लागले होते.रुची रस्त्यावरच्या खूणानिरखून त्या लक्षात घेत होती.एक-दिड किलोमिटरचा भाजी बाजार पुर्ण ओलांडून ती माणसे एक डाव्या बाजूच्यागल्लीत शिरले.पूढ आणख एक किलोमिटरचे अंतर चालल्यावर ते एक झोपडीत गेले. रस्ता,झोपडी सगळे नीटमनात टिपून रुची घराकडे निघाली.
रुची अजुन परत का आली नाही हे पाहायला तिच्या मैत्रिणी घरी गेल्या तर त्यांना कुलुप तोडलेले दिसले.पणतेवढ्यात आजीपण घरी आली.आजी पण घाबरली.रुचीला हाकामारू लागली. पण रुचीची काही ऐकु येइना. आरडा ओरडा ऐकुन शेजार पाजारचे गोळ झाले. चोरीचे कळल्यावर पटापट पोलिसांकडे तक्रार नोंदावीली .आजीनेबाबांना फोनकरून सगळा प्रकार सांगितला.पोलिस पण लगेच आले.आई बाबा पण आले. रुची दिसेना म्ह्णूनसगळेच खूप घाबरुन गेले होते.
रुची घरी येइ पर्यंत घरापूढे खूप गर्दी जमली होती.गर्दी बघुन ती खूप घाबरुन गेली.आजीला मीठी मारून ती हमसूनरडायला लागली. थोडीशी सावरल्यावर तिने पोलिसांना सगळा घडलेला प्रकार सांगितला.पत्ता सांगितला.पोलिसानीतिथे जाऊन तपास केला आणि चोर सापडले,चोरीचा माल पण सापडला.
चोरांना पोलिसांनी अटक केली आणि रुचीला बक्षिसा दिले. दूसर्या दिवशी सगळ्या वर्तमान पत्रामधुन ही बातमीझळकली. शाळेत पण तिचे कौतुक केले. अशी ही धाडशी रुची.